Isaiah 25

पपरमेश्वराच्या उपकाराबद्दल स्तुतिगीत

1हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस, मी तुला उंच करीन, मी तुझी स्तुती करीन.
कारण तू अद्भूत कृत्ये केली आहेत,
ते संकल्प तू पूर्विच योजून ठेवले होते, ते तू आपल्या परिपूर्ण विश्वासाच्या द्वारे घडवून आणले आहेस,
2कारण तू नगराला ढीग केलेस, तटबंदीच्या नगराला ओसाडी असे केले,
आणि परक्यांचे महाल असे ते नगर राहिले नाही.
3याकरिता सामर्थ्यवान लोक तुझे गौरव करतील व निर्दयी राष्ट्रे तुला भीतील.

4कारण तू गोरगरीबांचा रक्षणकर्ता आहेस, गरजूंना त्यांच्या दुःखाच्या समयी तू संरक्षक असा आहेस.

जेव्हा निर्दयींचा फटका भींतीला लागणाऱ्या वादळासारखा असतो,
तेव्हा तू उन्हाच्या तापात त्यांची सावली व सकंटाच्या वादळात त्यांचा निवारा असा आहेस.
5उन्हाच्या तापाने तापलेली भूमी मेघाच्या छायेने थंड होते, तसे जे निर्दय शत्रू आहेत ह्यांच्या गर्जना शांत करशील

6तेव्हा या सीयोन डोंगरावर म्हणजेच येरुशलेमेत सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांना मेजवानी तेथे उत्तमोत्तम चवदार पदार्थ असतील मांसाचे मज्ज सहीत तुकडे असतील,

तसेच चवदार द्राक्षमध देण्यात येईल ते सर्व खाऊन पिऊन तृप्त होतील.
7त्यावेळी पापाचे मेघपटल व मृत्यूछायेचे सावट तो या डोंगरावरून लोकांपासून दूर करील व त्यांना मोकळे करील.
8तो मरणाला कायमचे नाहीसे करील, परमेश्वर सर्वांच्या डोळ्यांचे अश्रू पुसून टाकील
देशातील त्यांच्या लोकांवरील सर्व अन्याय अपमान दूर करील परमेश्वर देव हे बोलला आहे हे तो करीलच.

9सर्व लोक त्या दिवशी म्हणतील व घोषणा देऊन सांगतील, “पाहा हा आमचा देव आहे यांच्यावर आमचा विश्वास आहे त्याची आम्ही वाट पाहातो,

कारण तोच आमचे तारण करणारा आहे हा आमचा परमेश्वर आहे आम्ही सर्व आंनदी आहो कारण त्याच्याकडून आम्हांला तारण प्राप्ती होईल.
10कारण परमेश्वराचा हात येरूशलेमेला आर्शीवाद देण्यासाठी
याचपर्वतावरून उचलला जाईल व त्याचे आर्शिवाद सर्देव यरूशलेमेकरा बरोबर राहतील,
पण मवाब गवताप्रमाणे पायाखाली तुडवील जाईल व फेकल्या जाईल.

11पाण्यात पोहणारा पोहण्यासाठी हातांनी पाणी सारतो तसेच देव त्यांना दूर सारील व त्यांचा सरेव अभिमान,

गर्व व सर्व दुराचार याचा नाश करून त्यांचा शेवट करील.
मवाबाची उंच तटबंदी व सुरक्षीत ठिकाणे नष्ट करील.
12

Copyright information for MarULB